चेक बाउंस प्रकरणी दोन महिन्यांचा कारावास

सुशील ओझा, झरी: चेक बाउंस प्रकरण एकाच्या चांगल्याच अंगलट आले आहे. या प्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
तालुक्यातील पाटण येथील देवन्ना सोमन्ना टोनपेवार नावाच्या इसमाने रंगनाथ स्वामी पथसंस्था शाखा मुकुटबन येथे चेक दिला होता. परन्तु खात्यात पैसे नसल्याने चेक बाउंस झाला.

ज्यामुळे सदर प्रकरण झरी न्यायालयात न्यायप्रविषठ करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकली. त्यात देवन्ना टोनपेवार दोषी आढ़ळल्याने त्यांना ४६ हजार रुपये दंड व २ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संस्थेतर्फे वकील ए एस निमजे यांनी बाजू मांडली.

Lead StoryRangnath Swami Path SansthaZari
Comments (0)
Add Comment