आरसीसीपीएल तर्फे होतकरू महिलांचा सत्कार

कंपनीचे प्रमुख दत्ता यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

सुशील ओझा, झरी: एम पी बिर्ला ग्रुप आरसीसीपीएल व स्वयंसिद्धा महिला लघुउद्योग समूह मुकुटबन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. रेक्झिन बॅग सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्सची प्रदर्शनी भरवण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आरसीसीपीएल कंपनीचे युनिट हेड अभिजित दत्ता, श्रीमती दत्ता यांनी क्रांतिजोति सावित्रीमाई फुले ह्यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच शोभा श्रीवास व निशी सिंग, सौ. शिंदे इत्यादी प्रमुख पाहुणे कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन वनश्री वनकर (सि. एक्सिकेटीव्ही CSR) यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन नवीन काकडे (SD head) व जयंत व्यास (HR head) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसिद्धा महिला लघुउद्योग समूह मुकुटबन येथील जयश्री आडे, रुक्सार सय्यद, चंद्रकला पैसटवार, प्रतिभा खोबरे, शीतल मुसळे, स्वाती ताडुरवार, अंजली परचाके, कलावती चिटलावार यांनी हातभार लावला.

हे देखील वाचा:

आज कोरोनाचे 6 रुग्ण, कनकवाडीत 2 रुग्ण

ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना आता मिळणार थंड हवा

Lead StoryRCCPLWomans day
Comments (0)
Add Comment