आज कोरोनाचे 6 रुग्ण, कनकवाडीत 2 रुग्ण

ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 11 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 4 रुग्ण तर 2 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. शहरातील कनकवाडी येथे 2 टागोर चौक व टिळक चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात भालर टाऊनशीप व कुंभारखनी टाऊनशीप येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 31 आहेत.

गुरूवारी 113 व्यक्तींचे रिपोर्ट यवतमाळ येथून प्राप्त झालेत. यात 3 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 110 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. गुरुवारी 5 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यातील 3 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 2 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 70 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

सध्या तालुक्यात 37 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 8 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 20 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 9 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1284 रुग्ण आढळून आलेत. यातील 1222 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

Lead Story
Comments (0)
Add Comment