अपंग विद्यार्थ्यांना फळ, बिस्किट वाटप करून वाढदिवस साजरा

वणी: वणी तालुक्यातील कोरंबी येथील सागर गोचे या युवकाने आपला वाढदिवस अपंग विद्यार्थ्यांना फळ व बिस्किट वाटप करून साजरा केला. अपंग निवासी कर्मशाळा येथील बुधवारी ता. ८ रोजी दुपारी २ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप भोयर जिल्हा समन्वय मिलिंद पाटिल मुंगोलीचे सरपंच रूपेश ठाकरे, युवक जिल्हा अध्यक्ष राहुल खारकर, जिल्हा सचिव राहुल खिरटकर, वणी तालुका अध्यक्ष आकाश सुर, तालुका संघटक उत्तम पाचभाई, पंकज मोहारे, नीतीन कवरासे, प्रफुल मोहीतकर, नितीन आवारी, अक्षय कवरासे आणि मान्यवर उपस्थित होते.

mungoli
Comments (0)
Add Comment