विक्रात चचडा यांच्या वाढदिवसाला विविध उपक्रम

मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्डचे मोफत वितरण

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील दबंग नेतृत्व, समाजसेवक, जनसामान्यांचे नेतृत्व , असंख्य युवकांचे आधारस्तंभ युवकांना नेहमी मार्गदर्शन करणारे लाडके नेते विक्रांत चचडा यांचा वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त युवासेना वणी तालुका व एन. एच. फाउंडेशनतर्फे पोलीस स्टेशन वणी येथे कोरोना प्रतिबंधात्मक वस्तुंचे वाटप झाले. यावेळी एन-95 मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड, मास्क आदी वस्तू वितरीत झाल्यात.

वाढदिवसाचे औचित्य साधून एम.पी.एस.सी, यू.पी.एस.सी वगैरे स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिबिर झाले. या ऑनलाईन शिबिरात राम वाघ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना यवतमाळ जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर होते. विशेष अतिथी युवासेना विस्तारक दिलीप दादा घुगे होते. या वेळी उपजिल्हाप्रमुख कुंदन टोंगे,

वणी विधानसभा चिटणीस हिमांशू बतरा, उपशहर प्रमुख अनुप चटप, सौरभ खडसे , शहर समन्वयक बंटी साहनी, शहर संघटक कुणाल लोणारे, विभागप्रमुख ललित जुनेजा, उपतालुका प्रमुख, झरी तालुकाप्रमुख पवन राऊत, झरी तालुका संघटक नीलेश बेलेकर, चेतन बरशेट्टीवर, शुभम मदान, ललित पोतराजे व असंख्य युवासैनिक उपस्थित होते.

Distributionetclead stroymasksvikrant
Comments (0)
Add Comment