टाकळी येथे पोळा सण उत्साहात साजरा

रोहण आदेवार, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथे पोळा उत्साहात आणि शांततेत पार पडला. गावातील मारुती मंदिराजवळ सर्व शेतकऱ्यांनी बैलांना सजवून आणले होते. या वेळी पोलीस पाटील संगीता राजेश आदेवार यांच्या मानाने तोरण बांधुन पोळ्याला सुरुवात केली. या तोरणाखालून बैलजोडींची वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली.

गुढी पोळ्यामध्ये आल्यानंतर गुढीच्या हाताने पोळ्याचे पूजन करण्यात आले. गुढी गावाच्या वेशीवर हनुमान मंदिरात पोहोचल्यानंतर हा पोळा वाजत-गाजत फुटला. हनुमान मंदिरात नेल्यानंतर बैलाची पूजा करण्यात आली व त्यानंतर घरोघरी पूजा करण्यात आली. या वेळी सर्व गावकरी तसेच जमादार मांडवकर उपस्थित होते.

kumbha takliLead StorypolaTakli
Comments (0)
Add Comment