ब्राह्मणी रोडवरील समृद्धी रेसिडेन्सी येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

आज दुपारची घटना, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील ब्राह्मणी रोडवरील समृद्धी रेसिडेन्सी येथील रहिवाशी असलेले संदीप अडलाकोंडा यांनी आज मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 2 वाजता ही घटना उघडकीस आली. त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र त्यांचा मृृत्यू झाला.

संदीप अडलाकोंडा (35) यांचा बल्लारपूर येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. हल्ली ते वणीतील ब्राह्मणी रोडवरील समृद्धी रेसिडेन्शिअल येथे कुटुंबीयांसह किरायाने रहात होते. आज मंगळवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुपारी त्यांनी घरातील पंख्याला दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली.

दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांच्या कुटंबीयांच्या ही बाब लक्षात आली. संदीप यांना तातडीने वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र चंद्रपूरला गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व आप्त परिवार असल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा:

भाड्याने दिलेली स्कॉर्पिओ घेऊन परप्रांतीय चालक रफुचक्कर

Lead StorySuicide
Comments (0)
Add Comment