जितेंद्र कोठारी, वणी: भाजपची माजी प्रवक्ता नुपूर शर्मा हिला अटक करुन फाशी देण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. नुपूर शर्मा हिने मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आज वणी शहरात शहर ए मदिना सोशल फाउंडेशन व मुस्लिम समाजातर्फे जनआक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने ऐन वेळी परवानगी नाकारल्याने ही रॅली स्थागित करण्यात आली.
रैलीत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजातील स्त्री पुरुष येथील शासकीय मैदानावर जमा झाले होते. परंतु प्रशासनाकडून रैली काढण्याची परवानगी न मिळाल्याने रैलीचे रूपांतर सभेमध्ये करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजाने वादग्रस्त विधान करणा-यांचा जोरदार निषेध नोंदवला.
अवमान करणा-यांना तात्काळ अटक करा – रज्जाक पठाण
इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करणारी भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा आणि त्या वक्तव्याला समर्थन करणारे नवीन जिंदाल व यती स्वरूपानंद यांचे आम्ही जाहीर निषेध करतो. नुपूर शर्मा हिला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी. प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही जन आक्रोश रैली स्थगित केली. परंतु पैगंबर साहेब यांची अवमानना करणाऱ्या दोषींवर जर शासनाने कारवाई केली नाही तर आम्ही शांत बसणार नाही.
– रज्जाक पठाण, अध्यक्ष – शहर ए मदिना सोशल फाउंडेशन, वणी
हे देखील वाचा:
चला डायनासोर्सच्या थरारक दुनियेत… जुरासिक वर्ल्ड सुजाता थिएटरमध्ये रिलिज