वणीत प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा

पोलीस विभागाच्या कर्मचा-यांना अल्पोपहाराचे वाटप

विवेक तोटेवार, वणी: 10 मे रविवारी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडी तालुका वणीच्या वतीने साजरा करण्यात आला. हा वाढदिवस कोरोनामुळे आलेल्या आपत्तीच्या काळात २४ तास आपल्या कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी व अधीकाऱ्यांना पाणी बॉटल व अल्पोपहार देउन साजरा करण्यात आला. याप्रसंगी गरिब व अनाथांना सुध्दा अल्पोपहार वाटण्यात आला.

पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या सहकार्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होऊ न देता हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मिलींद पाटील म्हणाले की पोलीस व आरोग्य विभागाच्या २४ तास चोख कामगीरीमुळे वणी अद्याप कोरोनापासून दूर आहे, केवळ यांच्यामुळेच वणीसारख्या गजबजलेल्या शहरात एकही कोरोणाग्रस्त नाही. ही आमच्या शहरासाठी आनंदाची बाब आहे. याचे श्रेय पोलीस प्रशासनाला जाते. अशी प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली.

यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे नेते मंगल तेलंग व मिलींद पाटील यांच्या नेतृत्वात भारत कुमरे, किशोर मुन, कपील मेश्राम, गौतम जीवने, उल्हास पेटकर आणि राकेश तावडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Lead StoryVanchit Bahujaun aghadi
Comments (0)
Add Comment