गंगाधरराव बोर्डे यांचे निधन

नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना पितृशोक

विवेक तोटेवार, वणी: वणी नगर पालिकेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे वडील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते गंगाधर मुरलीधरराव बोर्डे (81) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी 8 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, पत्नी नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

गंगाधरराव बोर्डे हे 1985 ते 1990 या कार्यकाळात नगर परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी विविध विषय समित्यांचे सभापती म्हणून जबाबदारी पार पाडली. ते धनोजे कुणबी समाजाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर आज सायंकाळी स्थानिक मोक्षधाम येथे अंतिमसंस्कार होतील.

हेदेखील वाचा

मारेगाव तालुक्यात आज 80 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

हेदेखील वाचा

गरजूंना मिळेल ऑक्सिजन, विद्यार्थांचे अर्धे शुल्क माफ

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

funeralgangadharraoisLead StorymorenoWani
Comments (0)
Add Comment