राजस्थानी महिला मंडळाचा बक्षीस वितरण समारंभ पार

गिरीश कुबडे, वणी: वणीतील राजस्थानी महीला मंडळाच्या वतीने राम मंदिर येथे विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचे बक्षिस वितरण 1 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता करण्यात आले.

या दोन दिवशीय कार्यक्रमात लहान मुलांसाठी चित्रकला, फॅन्सी ड्रेस, पेपर गेम, हौजी लकी चाईल्ड, महिलांसाठी पेपर स्पर्धा, लकी महिला, दांडिय सजावट, रांगोळी, अंदाज लावा, कला दाखविणे, इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात लहान मुले व महिला असे मिळून सुमारे 150 जणांनी सहभाग घेतला होता. या दोन दिवसीय कार्यक्रमाचा बक्षिस वितरण समारंभ उत्साही वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तरुणा जैन तर प्रमुख पाहुणे संगीता खटोड होत्या. पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले. या संपूर्ण बक्षिसांचे प्रायोजक संगीता खटोड व सुधा गोयल या होत्या. कार्यक्रमाचे संचालन मंडळाच्या अध्यक्ष स्नेहलता चुंबळे यांनी तर आभार प्रदर्शन पायल आबड यांनी केले.

Rajasthani Mahila
Comments (0)
Add Comment