शुक्रवारी आलेत 3 पॉजिटिव्ह

परिसरातल्याही व्यक्तींचा समावेश

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी तालुक्यात 3 पॉजिटिव्ह आलेत. त्यातील सुकनेगाव 1, सुंदर नगर 1, शिवाजी चौक 1 यांचा समावेश आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 670 झाली आहे.

शुक्रवारी 21 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. अद्याप 65 अहवाल येणे बाकी आहेत. सध्या तालुक्यात एकूण 670 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 649 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 21ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या 19 झाली आहे.

                                         शुक्रवारी एकही कोरोनामुक्त नाही

शुक्रवारी एकाही कोरोनामुक्त व्यक्तीला सुट्टी नाही. सध्या तालुक्यात 21 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 7 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 15 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 5 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 7 व्यक्ती भरती आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

COronaCovid 19fridayLead StoryReporttalukaWani
Comments (0)
Add Comment