भंगार चोरी प्रकरण: आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी

तलवारीचा धाक दाखवून कोळसा खाणीतून चोरले होते भंगार

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी दुपारी 2.30 वाजता कुंभारखनी खाणीतून वेकोलिचे भंगार चोरून आणणारे तीन ट्रक जप्त करण्यात आले होते. बुधवारी रात्री या चोरीमध्ये सामिल असणा-या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. या सहाही आरोपींना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मंगळवारी रात्री उशिरा वणी क्षेत्रातील कुंभरखनी येथील बंद असलेल्या खाणीतून वेकोलीच्या मालकीचे भंगार चोरट्याने कापून नेले होते. याबाबतची तक्रार बुधवारी उशिरा वणी पोलिसात कमल किसन देठे यांनी दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये मोहमद शकील मोहम्मद मुसा, उमेश दशरथ धांडे, खुशाल शंकर चहारे, राजू बापूराव भट, गोपाळ सुधाकर पोटे, सैय्यद रोशन याकुब अली यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम 379, 34 भा द वि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(हे पण वाचा: तलवारीच्या धाकावर कोळसा खाणीतून भंगार चोरी)

Lead StoryWCL
Comments (0)
Add Comment