परमडोहच्या जि. प. शाळेत वृक्षारोपण
विद्यार्थ्यांनी लावले विविध देशी झाडांची रोपं
विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवारला वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. एसीसी आणि दिलासा संस्थेच्या माध्यमातून रोपे पुरविण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली.
मान्यवर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनात वृक्षांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. कार्यक्रमाला प्रभारी सरपंच संदीप थेरे, सदस्य नितीन काकडे, बिट जमादार अमोल कोवे, दिलासाचे संयोजक कुणाल तडस, पोलिस पाटील जीवन डवरे, ग्रामसेवक परचाके, मुख्याध्यापक हंसराज काटकर, निलेश सपाटे, शिक्षिका निकुंबे, रवींद्र किनाके आणि विद्यार्थी उपस्थित होते.