शिंदोल्यात सेनेच्या कामगार संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण

कामगारांच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन
विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिंदोला येथे दि.७ रविवारला शिवसेनेच्या भारतीय कामगार संघटनेची स्थापन करण्यात आली. यावेळी शाखा फलकाचे अनावरण शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास यांच्या हस्ते करण्यात आले. सह उदघाटक म्हणून उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, यवतमाळ कामगार सेना अध्यक्ष अविनाश भुजबळराव उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी शिवसेनेचे सुनिल कातकडे होते, प्रमुख पाहुणे म्हणून गणपत लेडांगे, दिलीप काकडे, डॉ. विलास बोबडे होते. तर सरपंच संदीप थेरे, उपसरपंच किशोर किनाके यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कामगार सेनेची कार्यकारिणी जाहीर केली. चालक कामगारांना प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. कामगारांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला शिवसैनिक बंटी ठाकूर, सुधीर थेरे, सुभाष ताजने, शशिकांत नक्षीने, बाळु तुराणकर, अजय चन्ने, बाळु चेडे, ललित लांजेवार, विशाल किन्हेकर, किशोर थेरे, संजय डवरे, राम भेंडाळे, रूपेश पेटकर, निखिल देरकर, श्रीकांत उपासे, पांडुरंग नांदे,अजिंक्य शेंडे आदींची उपस्थिती होती.
Kamgar SenaLead StoryShivsena
Comments (0)
Add Comment