बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सतिश दिलिप मेश्राम (29) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वेगाव येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. तो मजुरी करायचा. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास तो गावालगतच्या शेतात गेला होता. तिथे त्याने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने शेतातून घरी जाणा-या काही लोकांना सतिशने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी याची माहिती गावातील पोलीस पाटलांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. सतिशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मृतकाच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व आप्तपरिवार आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.