सुरपाम व तिरणकार मृत्यू प्रकरणी आमरण उपोषण

सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचे यवतमाळला उपोषण

रोहण आदेवार, वणी: वणी पोलीस स्टेशनमध्ये विष प्राषणाने मृत्यू झालेला मारोती बोन्शा सुरपाम व धीरज सुरेश तिराणकर यांचा संशयास्पद मृत्यूची सलोख चौकशी करण्यात यावी व तसेच सुरपाम मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी यवतमाळ येथे विविध आदिवासी व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते जिल्हा अधिक्षक कार्यालया समोर, तिरंगा चौक येथे सोमवारी दिनांक ०८ जुलै पासून आमरण उपोषणाला बसले आहे.

यात वणी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल धुर्वे यांच्यासह गीत घोष, संतोष चांदेकर, सुरेश तिराणकार, संतोष पेंदोर, भाष्कर तिराणकार, राजु पोयाम, मनिष तिराणकार, बंडु सिडाम, गजु मडावी, मंगेश कोकाटे, बोन्शा सुरपाम, लक्ष्मीबाई सुरपाम व अशोक सुरपाम यांचा समावेश आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस होता. सुरपाम यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणी आज महिला संघटेच्या वतीने पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनिषा तिरणकर, राज्याध्यक्षा, अ. भा. महिला संवै़धानिक हक्क परिषद यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. यावेळी परचाके, जि.उपाध्यक्षा आफ्रोट, रेखा भगत, विद्या कांबळे, वैजयंतीमाला पेंदोर, सुनंदा तिराणकार, शोभा तिराणकार, डॉ. कविता खापरकर, अस्मिता महिला फांडेशन या महिला नेत्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Lead StorySurpamuposhan
Comments (0)
Add Comment