वणीत आणखी 2 कोरोनाचे रुग्ण, रुग्णांची संख्या 12

आता दुस-या साखळीतील 4 व्यक्ती पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: काल बुधवारी वणीत कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यानंतर आज दिनांक 9 जुलै रोजी पुन्हा नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वणीत कोरोना रुग्णांची संख्या ही 12 झाली आहे. आज निष्पन्न झालेले दोन्ही रुग्ण दुस-या साखळीतील आहे. दुस-या साखळीत आतापर्यंत 2 रुग्ण आढळले होते. आता ही संख्या 4 झाली आहे.

पहिल्या साखळीमध्ये 7 रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर दिनांक 4 जुलै रोजी वणीत कोरोनाचे दोन रुग्ण निष्पन्न झाले होते. ही नवीन साखळी होती. या दोन रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 47 जणांचे स्वॅब पाठवण्यात आले होते. त्यातील 42 जणाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. तर आधीचा एक व दुस-या साखळीतील 5 असे सहा रिपोर्ट पेन्डिंग होते. आज हे 6 रिपोर्ट आले असून त्यातील दोन रुग्ण पॉजिटिव्ह आले आहेत.

तिस-या साखळीतील 19 व्यक्ती कॉरन्टाईन 
पहिली साखळी जवळजवळ खंडीत झाली असून आता केवळ दोन साखळी ऍक्टिव्ह आहेत. त्यातील तिसरी साखळी ही साईनगरी येथील रुग्णामुळे तयार झाली आहे. या रुग्णाच्या संपर्कातील 19 व्यक्तींना बुधवारी कॉरन्टाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब आज तपासणीसाठी यवतमाळला पाठविण्यात आले. उद्या त्यांचा रिपोर्ट येण्याची शक्यता आहे.

● कोरोना चार्ट (9 जुलै) ●
वणीतील कोरोनाचे एकूण रुग्ण – 12
बरे झालेले रुग्ण – 5
ऍक्टव्ह रुग्ण – 7
एकूण साखळी – 3
कॉरन्टाईन असणा-यांची संख्या – 60

(हे पण वाचा: 86 वर्षांची आजी व दीड वर्षाच्या नातीची कोरोनावर मात)

86 वर्षांची आजी व दीड वर्षाच्या नातीची कोरोनावर मात

 

COronaCorona in waniLead StoryWani Bahuguni Livewani bahuguni live NewsWani Corona Update 8Julywani Corona Update 9 Julyकोरोनाकोरोना झरीकोरोना वणी अपडेटकोविड केअर सेन्टर वणीपरसोडा
Comments (0)
Add Comment