दारू तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

ब्राह्मणी फाट्याजवळ चंद्रपूर जिल्ह्यात दारू नेताना अटक

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 8 जून दुपारी 12 वाजता दरम्यान वाहतूक पोलिसांनी दुचाकीवरून दारू घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 41 हजार 814 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोमवारी 8 जूनला वाहतूक पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान माहिती मिळाली की वणीतील ब्राह्मणी फाट्याजवळून दोन इसम दुचाकीवर दारू घेऊन जात आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत सापळा रचला. दुपारी 12 वाजता दरम्यान दुचाकीवर दोन इसम जातांना दिसले. त्यांना दुचाकी क्रमांक MH 34 AX 6266 रोखून तपासणी केली.

त्यांच्याजवळ देशी विदेशी असा एकूण 11 हजार 814 रुपयांची दारू व दुचाकी असा एकूण 41 हजार 814 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात आरोपी अविनाश रमेश मुत्यापवार (35) रा. चंद्रपूर व आकाश गोवर्धन उईके (33) रा. चंद्रपूर यांना अटक केली. वाहतूक विभागातील संदीप मंडाले यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर त्यांच्यावर कलम 65 (अ) व (इ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Lead StoryLiquorLiquor Smuglling
Comments (0)
Add Comment