मुकुटबन येथे फळ व भाजीपाला विक्रेत्यांना छत्री वाटप

गोदावरी अर्बन बँकेचा स्तुत्य उपक्रम

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊन संपताच फळ व भाजीपाला विक्रेते रस्त्यावर रखरखत्या उन्हात आपले दुकान व हातगाडी लावून विक्री करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशा गरीब दुकानदारांना कडक उन्हापासून बचाव करिता मुकुटबन येथील गोदावरी अर्बन शाखेने पुढाकार घेऊन त्यांच्या सुरक्षतेकरिता 8 जून रोजी फळे व भाजीपाला विक्रेत्यांना छत्रीचे वाटप केले.

या प्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समिती तथा व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष मंगेश गादेवार, राजू बोळकुंटवार, संदीप पोलशेट्टीवार, प्रमोद पन्नामे, विनोद महाजन, धम्मपाल निमसरकार (शाखाधिकारी), चेतन ठाकरे (सहायक अधिकारी), रविंद्र तावडे यांच्यासह सर्व कर्मचारी व सर्व दैनिक ठेव, आवर्त ठेव प्रतिनिधी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

संगीता नाकले यांची महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड

आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण, दुसरी लाट ओसरतेय

वणी शहरात मालवाहू व जड वाहनामुळे वाहतूक विस्कळीत

 

Godavari UrbanGodavari Urban BankLead Story
Comments (0)
Add Comment