आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण, दुसरी लाट ओसरतेय

तालुक्यात कोरोनाचे अवघे 25 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळलेत. दोन दिवसांच्या गॅपनंतर आत तालुक्यात रुग्ण आढळला. यातील एक रुग्ण हा शहरातील रंगारीपुरा येथील आहे तर दुसरा रुग्ण हा मारेगाव तालुक्यातील आहे. दरम्यान आज 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजच्या रुग्णसंख्येवरून तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही आता 25 झाली आहे.

आज यवतमाळहून 37 रिपोर्ट प्राप्त झाले यातील 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आला. तर आज 85 संशयीतांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 1 संशयीत पॉझेटिव्ह आला. आज आलेल्या रुग्णांवरून यवतमाळ येथे 34 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 78 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे 25 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 3 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 16 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 6 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.

तालुक्यात कोरोनाचे एकूण 5252 रुग्ण आढळून आलेत. यातील 5134 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

लालपरी सुरू झाली, मात्र प्रवासी फिरकेना

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

Corona Update WaniLead Story
Comments (0)
Add Comment