दीपक मत्ते यांची रुग्णाला आर्थिक मदत

महिलेवर सावंगी येथे उपचार सुरू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पिंपळगाव या गावातील अनुबाई बावणे या आजारी होत्या. त्यांची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांच्याजवळ उपचारासाठी पैसे नव्हते. त्यांना वर्धा येथील सावंगी येथे उपचारासाठी जायचे होते. मात्र पैश्याअभावी त्यांचा उपचार थांबला होता.

ही बाब गावातीलच सामाजिक कर्यकर्ते दीपक मत्ते यांना कळाली. त्यांनी लगेच 10 हजार रुपयांची मदत करून अनुबाईची रवानगी सावंगीच्या रुग्णालयात केली. सध्या अनुबाईवर सावंगी येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे आधीच सर्वांचीच परिस्थिती बिकट आहे. अशातच दीपक मत्ते यांनी मदत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

Lead StoryPimpalgaon
Comments (0)
Add Comment