कोना येथील शेतकऱ्याची आत्महत्या

गिरीश कुबडे, वणी: वणी तालुक्यातील कोना या गावातील रहिवाशी महादेव इस्तारी परचाके (६०) या शेकऱ्याने रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आपल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.

महादेव यांच्यावर सेंट्रल बँकचे ४० हजाराचे कर्ज होते. त्यांच्या घरातील परिस्तिती हालाखीची होती. त्यामुळे घरात रोज लहान लहान वाद व्हायचे. अखेर महादेव यांनी या सर्व गोष्टीला कंटाळून आपल्या शेतात 11 वाजताच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केली.

महादेव यांनी विष प्राषण केल्याची माहिती मिळताच गावातील काही लोकांनी त्यांना उपचारासाठी वणी येथील शासकीय रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, दोन सून व दोन नातं आहे. त्यांच्या आत्महत्येने गावात शोककळा पसरली आहे.

KonaLead StoryPoisonSuicide
Comments (0)
Add Comment