आज तालुक्यात दोन पॉजिटिव्ह

संख्या कमी, तरीही दक्षता बाळगण्याचे आवाहन

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळलेत. हे 2 रुग्ण रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांतील 1 रुग्ण वणी शहरातील तर दुसरा भालर येथील आहे. आजच्या रुग्णांमुळे कोरोनाची तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 818 झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरीही दक्षता बाळगण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.

आज 13 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 2 संशयीत पॉजिटिव्ह तर 13 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 9 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 90 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 46 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 818 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 769 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज 10 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. सध्या तालुक्यात 46 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 25 जण होम आयसोलेट आहेत. 21 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 10 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालुक्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

हेदेखील वाचा

फक्त विदर्भातच होणारी ‘आठवीची पूजा’ नक्की काय आहे

 

COronaCovid 19Lead StoryPositiveReportsundayTwoWani
Comments (0)
Add Comment