मुकुटबन येथील विद्यार्थांचे शालेय विभागीय स्पर्धेत निवड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील मातोश्री पुनकाबाई वी. जा. भ. ज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेला विद्यार्थी रितीक अशोक कल्लूरवार याचा चारशे मीटर रनींगमध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला. त्याची निवड अकोलाकरिता सुद्धा झाली. करिता त्याचा सत्कार त्यांच्या शाळेसह स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेस मध्ये करण्यात आला.नकार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक सुनील ढाले होते तर प्रमुख पाहुणे सुशील ओझा, मुळे, राहुल राजूरकर होते.

अध्यक्ष सुनील ढाले व सुशील ओझा यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. तर अध्यक्षीय भाषणात सर्व मुलांनी रितीक याचा आदर्श घ्यावा, मेहनत केल्यास यश नक्कीच प्राप्त होते. तरी उपस्थित विद्यार्थ्यांनी खेळाडू बना आपले व आपल्या पाल्यासह गावाचे शाळेचे नाव उज्ज्वल करा असे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनी रितीक याला पुढच्या वाटचालीचा शुभेच्छा दिल्या. संचालन आझाद उदकवार यांनी केले तर आभार संजय भोयर यांनी मानले.

Lead StoryMukutbanSatkarsportsStudent
Comments (0)
Add Comment