क्रांती युवा ग्रुप वणीतर्फे भव्य आरोग्य शिबिर

250 हुन अधिक रुग्णांची तपासणी

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील क्रांती युवा ग्रुप तर्फे भव्य आरोग्य निदान व स्त्रीरोग निदान तथा रक्त गट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आज शनिवारी सकाळी 11 वाजता बिर गौसिया अरबी मदरसा, शास्त्री नगर, मोक्षधाम रोड, वणी येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यात विविध डॉक्टरांच्या टीमद्वारा सुमारे 260 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्धमान इंटरनॅशनल वणीचे अध्यक्ष विजयबाबु चोरडिया तर प्रमुख अतिथी म्हणुन वाहतुक पोलिस निरिक्षक वणीचे संग्राम ताठे होते.

या शिबिराकरीता डॉ. अब्दुल सत्तार, डॉ. अनिरूध्द वैद्य, डॉ. पुजा वैद्य, डॉ. अंकिता जयस्वाल यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांना आयोजकांतर्फे औषधीही पुरवण्यात आली. या शिबिरात रक्त तपासणीकरिता डॉ, प्रशांत खैरे तर औषधांची वाटणी जितेंद्र डाबरे, शिवेंद्र ब्राम्हणकर यांनी केली. या प्रमुख पाहुणे म्हणुन दि. यवतमाळ अर्बन को. ऑप. बॅंक लि. वणीचे संचालक प्रशांत माधमशेट्टीवार व सामाजिक कार्यकर्ते प्रताप तोटावार, जामा मस्जिद ट्रस्ट वणीचे सचिव इसराईल शेख, सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र बोथरा हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन सुरज चाटे यांनी केले, प्रास्ताविक राजू गव्हाणे तर आभार कपिल जुनेजा यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गृपच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Lead Storyyuva kranti group
Comments (0)
Add Comment