जितेंद्र कोठारी, वणी: येथील जत्रा मैदान परिसरात पोलीस चौकीमागे पान टपरीच्या शेडमध्ये एका अनोळखी इसमाचा मृत देह आढळला. बुधवारी सकाळी 8 वाजता ही घटना उघडकीस आली. नगरसेवक संतोष पारखी यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला. मृत व्यक्ती अंदाजे 45 ते 50 वयोगटाचा असून 5.5 फूट उंचीचा आहे. मृतकच्या अंगावर निळया रंगाची पॅन्ट व भुरकट रंगाची जर्सी आहे. तसेच मनगटावर राखी बांधून आहे.
बातमी लिहेपर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटली नसून अति मद्यप्राशनमुळे मृत्यू झाल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयाच्या मोरचरीमध्ये मृतदेह ठेवण्यात आला आहे. पुढील तपास जमादार विठ्ठल बुरेवार करीत आहे.
हे देखील वाचा: