गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

चिखलगाव येथील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार 8 मे रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान उघडकीस आली. अनिल रामकृष्ण नागपुरे (48) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार अनिल नागपुरे यांचे चिखलगाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ घर आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनिलला दारू पिण्याची सवय होती. त्यामुळे त्याची पत्नी आपल्या दोन मुलांसह काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती.

रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत अनिल घराचे बाहेर निघाला नाही म्हणून त्याचा भावाने अनिलच्या घरात जाऊन पाहणी केली. त्यावेळी अनिल हा घरातील लाकडी फाट्याला गळफास घेऊन लटकलेला दिसला. याबाबत वणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

वणी-मुकुटबन मार्गावर 18 नंबर रेल्वे पुलाजवळ अपघात

निर्धारित वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरू राहिल्यास 50 हजारांचा दंड

ChikhalgaonLead StorySuicide
Comments (0)
Add Comment