क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचा जयंती उत्सव साजरा

बंटी तामगाडगे, वणी: रविवारी दिनांक 8 एप्रिलला क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. पाण्याच्या टाकीजवळील भीमालपेन देवस्थान या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. या निमित्ताने सामाजिक प्रबोधन मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. निरंजन भाऊ मसराम राष्ट्रीय अध्यक्ष गोंडवाना संग्राम परिषद हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगल मडावी माजी सदस्य जि. प. यवतमाळ हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक अवचितराव सोयाम गोंडवाना विचार मंच, एम एम आत्राम समाजप्रबोधनकार पुणे आणि प्रवीण आडेकर गोंडवाना टायगर भद्रावती होते.

Jayanti Utsav
Comments (0)
Add Comment