योगेश चिंडालिया यांना विधी स्नातक पदवी

नुकताच पदवी वितरण कार्यक्रमात करण्यात आला सन्मान

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील व्यावसायिक योगेश मंगल चिंडालिया यांनी गोंडवाना विद्यापिठाची विधी स्नातक ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. ते सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे. नुकताच गोंडवाणा विद्यापीठाचा पदवी वितरण सोहळा पार पडला यावेळी त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, सुधाताई पोटदुखे, डॉ. अंजली हस्तक, प्राचार्य दिक्षित, काळे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. योगेश हे आपल्या यशाचे श्रेय पत्नी रश्मी चिंडालिया, ऍडव्होकेट गोविंद दोरके, शिक्षक व कुटुंबीयांना देतात. त्यांच्या या यशाबाबत साई ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रकाश नंदुरकर, सचिव गणेश घंटेवार, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश बोबडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. व्यवसाय सांभाळून पदवी प्राप्त केल्यामुळे त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.  

Yogesh Chindaliya