विद्या निकेतन स्कूलमध्ये बाबासाहेबांना आदरांजली

महापरिनिर्वाण दिनानिमित्य विद्यार्थ्यांची मानवंदना

संतोष ढुमणे, कायर: 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.

सर्वप्रथम महामानवाच्या प्रतिमेला हार अर्पण करून विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भीमगीते गाऊन वंदन केले. यावेळी विद्यार्थ्यांचे भाषणे देखील झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातुन महामानवाच्या आयुष्यातील प्रसंग सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरला ठावरी तर प्रमुख पाहुणे जि. प. शाळेच्या शिक्षिका कोरवतकर या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्मिता राजूरकर यांनी केले. तर आभार अश्विनी कुचनकार यांनी मानले. कार्यक्रमासाठी सचिन पिंपळकर, रतन जेऊरकर, काशीनाथ आत्राम, पानघाटे, पावडे यांनी परिश्रम घेतले.

Lead StoryMahaparionirvan dinVidyaniketan English Medium School
Comments (0)
Add Comment