जितेंद्र कोठारी, वणी: प्रकाश महोत्सव दिवाळी सणाचे औचित्य साधून येथील जैताई अन्नछत्र समिती तर्फे शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांना साड्या व मिठाई भेट स्वरूप देण्यात आली. समितीतर्फे शनिवार 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जैताई अन्नछत्र समितीचे माधवराव सरपटवार, मुन्ना तुगनायत, मुन्ना पोद्यार, नामदेव पारखी, वाल्मिक बावणे, मयुर गोयनका, दिवाण फेरवाणी, सुरेश मांडवकर, रविंद्र पाराशर, प्रमोद वासेकर, उत्तम गिरसावळे, प्रशांत महाजन रुग्णालयात उपस्थित होते.