बुधवारी 2 पॉजिटिव्ह रुग्ण आढळलेत

एक भालरचा तर दुसरा चिखलगावचा

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी 2 पॉजिटिव्ह आलेत. त्यातील एक भालरचा असून दुसरा चिखलगावचा आहे.आज आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 660 झाली आहे.

आज 21 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. अद्याप 58 अहवाल येणे बाकी आहेत. सध्या तालुक्यात एकूण 660 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 634 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 29 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या 19 झाली आहे.

                                              बुधवारी 7 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 7 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 24 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 12 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 12 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 6 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 12 व्यक्ती भरती आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

COronaLead StoryPositiveReportTwoWednesday
Comments (0)
Add Comment