सरस्वती माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा

स्वयंशासन उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग
सुशील ओझा, झरी:– तालुक्यातील मुकूटबन येथील  सरस्वती माध्यमिक विद्यालयात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने शिक्षकदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्म ५ सप्टेंबर ला झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्यात येत होता . स्वतः शिक्षक असल्याने माझा वाढदिवस करण्याऐवजी याला शिक्षकदिन म्हणून साजरा करण्याचा ठरविण्यात आले.
तेव्हापासून डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने शिक्षकदिवस साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कु, प्राची नरांजे प्रमुख पाहुणे कु,केतकी वराटे  ,मृदुला बोधे,समीक्षा आंबटकर,स्वेता खडसे,आचल जनुंघरी,जाणवही बरडे, ऋषिकेश ठाकरे, हर्ष टोंगे, श्रेया खडसे आदींनी शिक्षक म्हणून काम पाहिले आभार प्रतीक्षा मंदुलवार त्यावेळी ममता जोगी व कुमरे सह शिक्षकवर्ग कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
dinLead StorymadhyamikSarsvatishikshakVidyalayZari
Comments (0)
Add Comment