आज तालुक्यात एकही रुग्ण नाही, आता अवघे 31 ऍक्टिव्ह रुग्ण

आज 102 संशयीतांपैकी सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे एकही रुग्ण आढळले नाहीत. याशिवाय आज 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या रुग्णसंख्येवरून तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही आता 31 झाली आहे. आज जरी यवतमाळहून एकही रिपोर्ट प्राप्त झाला नसला तरीही आज 102 संशयीतांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात सर्व संशयीत निगेटिव्ह आलेत. हा एक दिलासा मानला जातोय. दरम्यान आज अनलॉकमुळे बाजारपेठ उघडली. मात्र वणीकरांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली. यावेळी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवल्या गेले. जर असेच सुरू राहिले तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

आज यवतमाळ येथे 21 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 35 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे 31 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 2 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 20 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 9 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.

तालुक्यात कोरोनाचे एकूण 5250 रुग्ण आढळून आलेत. यातील 5126 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

अनलॉक होताच तिस-या लाटेसाठी वणीकरांकडून स्वागत…!

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Corona Update WaniLead Story
Comments (0)
Add Comment