मारेगाव तालुक्यात अवघे 13 ऍक्टिव्ह रुग्ण

आज एकही रुग्ण नाही, 6 रुग्ण कोरोनामुक्त

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याची आता कोरोनामुक्ती कडे वाटचाल होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. आज सोमवारी दिनांक 7 जून रोजी आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तर दुसरीकडे तालुक्यातील 6 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज आरोग्य विभागाने 36 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यात एक ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तसेच आज 38 व्यक्तींचे आरटीपीसीआर टेस्ट केली असून ते रिपोर्ट यवतमाळ येथे तपासणी करिता पाठवण्यात आले आहे. अद्याप 63 व्यक्तीचे रिपोर्ट पेंडिंग आहे.

तालुक्यात सध्या केवळ 13 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंटरवर 11 रुग्ण उपचार घेत आहे तर होम आयसोलेट एकही नाही. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर 2 जण उपचार घेत आहे.

हे देखील वाचा:

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

 

Lead StoryMaregaon
Comments (0)
Add Comment