विवेक तोटेवार, वणी: अहेरी (बोरगाव) घाटावर रेती आणण्याकरिता जाणार ट्रॅक्टरचा आज 11 वाजताच्या सुमारास पिंपळगाव रोडवरील वळणावर पलटी झाला. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर ड्रायव्हर जखमी झाला. रवी भारत मेश्राम (27) वर्ष रा. वागदरा असे मृतकाचे नाव आहे. तर ट्रॅक्टर चालक विशाल तुळशीराम नैताम (32) रा. नवीन वागदर असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मंगळवारी दिनांक 7 मो रोजी सकाळीच्या सुमारास वणीवरून अहेरी (बोरगाव) येथे किसन नारायण मोहबिया यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (MH 29 DP 5601 ट्रॉली क्रमांक MH 29 AK 5157) जात होता. सदर ट्रॅक्टरवर रवी मेश्राम हा ड्रायव्हर होता तर विशाल नैताम हा मजूर म्हणून होता. 11 वाजताच्या सुमारास पिंपळगाव येथीव वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर पलटी झाला.
या अपघातात मजूर विशाल हा ट्रॉलीखाली दबला गेला व त्याचा जागीच मृत्यु झाला. तर ड्रायव्हर गंभीर जखमी झाला. त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. विशाल याने निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालविल्याने चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे