शेख सिकंदर शेख महेबुब यांचे निधन

पत्रकार शेख दिलदार यांना पितृशोक

नागेश रायपुरे, मारेगाव: भारत गादी पिंजनालयाचे संचालक तथा Ntv,Ctv चे रिपोर्टर शेख दिलदार यांचे वडील शेख सिकंदर शेख महेबूब (85) यांचे आज दुपारी 12 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेख सिकंदर यांचे मारेगाव शहरातील प्रथम गादी पिंजनालयचे दुकान होते. सोबतच त्यांचा मंडप डेकोरेशनचाही व्यवसाय होता. ते नेहमी सामाजिक कार्यात तत्पर राहायचे. ते स्वभावाने मनमिळावू असल्याने त्यांची वेगळी ओळख होती.

ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दरम्यान आज अचानक त्यांची प्रकृती हालावल्याने रुग्णालयात भरती केले असता त्यांचा उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्या मागे पत्नी, मुले शेख खलील, शेख दिलदार, मुली, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. स्थानिक कब्रस्थानामध्ये त्यांचा दफनविधी झाला.

हेदेखील वाचा

युवकाची फाशी घेऊन आत्महत्या

हेदेखील वाचा

दिलासा: आज 138 रुग्णांची कोरोनावर मात, तर 34 पॉझिटिव्ह

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

 

Lead StorymahebubMaregaonnonoreShaikhsikandar
Comments (0)
Add Comment