श्रीराम नवमी शोभायात्रेची तयारी पूर्ण, यंदा भव्य दिव्य निघणार शोभायात्रा

नगर वाचणालयात शोभायात्रा नियोजनाची बैठक संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी शहरातील नगर वाचनालयातील प्रांगणात श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुन्ना महाराज तुगणायत यांच्या अध्यक्षतेत ही बैठकी पार पडली. या बैठकीत उपस्थितांनी शोभायात्रेसाठी विविध सूचना केल्यात. कोरोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आल्याने यावर्षी जल्लोषात शोभायात्रेचे आयोजन करण्यात येणार असे मनोगत यावेळी प्रभु श्रीराम नवमी शोभा यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी व्यक्त केले. रविवारी दिनांक 10 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता भव्य शोभायात्रा शहरातील मुख्य चौकातून निघणार आहे. या बैठकीला प्रशांत भालेराव, दिपक नवले, राजू उंबरकर, विनय कोंडावार, राजभाऊ पाथ्रटकर, विजय चोरडिया, प्रा. महादेवराव खाडे, ओम ठाकुर, गणपत लेडांगे, आशिष कुळसंगे, संजय पिंपळशेंडे, राकेश खुराणा, राजाभाऊ बिलोरीया, श्रीकांत पोटदुखे, उदय जोबनपुत्रा, नितिन शिरभाते, शंकर घुग्गरे, प्रमोद इंगोले, चंद्रकांत फेरवानी, अमित उपाध्ये, श्रीकांत पोटदुखे, बंटी ठाकुर, निशिकांत नक्षिणे, संतोष डंभारे, राकेश बुग्गेवार, मनोज सरमोकदम, गजानन कासावार यांच्यासह मोठ्या संख्येने श्रीराम भक्त उपस्थित होते.

shobhayatra