भावाने फोडलं बहिणीच डोकं….

भावाविरूद्ध झाला गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: खाजगी दुकानात नोकरकाम करणाऱ्या विधवा बहिणीचं डोकं भावानं फोडल्याची घटना येथील वॉटर सप्लाय जवळ घडली. बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भावाविरुद्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेच्या पतीचा सहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला. तिला एक मुलगा व एक मुलगी आहे.

एका खाजगी दुकानात नोकरी करून ती आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करते. येथील गणेशपूर रोडवरील वॉटर सप्लायजवळ एका घरात ती भाड्याने राहते. मागील 7-8 महिन्यापासून बांधकाम मिस्त्री काम करणारा महिलेचा भाऊ तिच्या घरात राहतो. त्याला दारूचे व्यसन असून तो बहिणी सोबत नेहमी भांडण करीत असे.

दि. 5 नोव्हें. रोजी रात्री 9 वाजता फिर्यादी महिला कामावरून परत घरी आली. तेव्हा तिचा भाऊ महेंद्र नामदेव किनाके (30 वर्ष) हा दारू पिऊन आला. दोघांमध्यो काही कारणांवरून वाद झालेत. तसेच त्याने शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देऊन कुकरच्या झाकणाने तिच्या डोक्यावर वार केलेत.

डोक्यावर मार लागून रक्त निघाल्यामुळे महिला घाबरली. भविष्यात भावाकडून जीवितास धोका असल्याची शक्यता असल्यामुळे महिलेने वणी पोलीस ठाण्यात भाऊ महेंद्र नामदेव किनाके (30 वर्ष) तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्द 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

complaintinjuredLead StorylodgedsisterWani
Comments (0)
Add Comment