लालगुडा येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील लालगुडा या गावातील एक इसमाने मंगळवार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

प्रकाश कुडमेथे (35) रा. लालगुडा असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. प्रकाश यांनी सकाळी सात वाजताच्या सुमारास आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी मृतकास वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले आहे. घटनेचा तपास विठ्ठल बुरेवार करीत आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी संध्याकाळी प्रकाश यांचा घरी थोडा वाद झाल्याची माहिती आहे. त्यातून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. प्रकाश यांच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

LalgudaLead StorySuicide
Comments (0)
Add Comment