मारेगाव येथे विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

सततच्या आत्महत्येने तालुक्यात खळबळ

नागेश रायपुरे, मारेगाव : सततच्या आत्महत्यांच्या घटने मुळे अवघा तालुका हादरला आहे. त्यात रविवारी पुन्हा एका 40 वर्षीय इसमाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. इब्राहिम खान चांद खान पठाण असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहिती नुसार मृतक इब्राहिम खान चांद खान पठाण (40) हे मारेगाव येथे राहत. त्यांच्यावर हात उसणे घेतलेले खाजगी कर्ज होते. काही वर्षांपूर्वी इब्राहिमच्या मुलाचा आजाराने मृत्यू झाला. ते त्यामुळे नेहमी निराश राहायचे. याच नैराश्यातून रविवारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान त्यांनी विषारी औषध प्राशन केले. कुटुंबियांनी लक्षात येताच इब्राहिम यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात भरती केले.

परस्थिती गंभीर असल्याने इब्राहिम यांनी यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. मात्र यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान सायंकाळी 8 वाजता दरम्यान इब्राहीम यांची प्राणज्योत मावळली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.इब्राहिमच्या मागे पत्नी, दोन मुली, आई असा आप्त परिवार आहे.

Lead Story
Comments (0)
Add Comment