वणी बहुगुणी डेस्क : सहा महिन्याची गरोदर असलेल्या गायीचे दोन्ही पाय बांधून अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करण्याची संतापजनक घटना तालुक्यातील रासा येथे रविवार 6 जुलै रोजी पहाटे 3 वाजता उघडकीस आली. फिर्यादी गाय मालक महीलेनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी नराधम आरोपीला ताब्यात घेतले आहे. आनंदराव भुरु टेकाम (38) रा.अनंतपुर (सुर्ला) ह. मु. रासा अस नराधम आरोपीचे नाव आहे.
दाखल तक्रारीनुसार फिर्यादीकडे एक पांढऱ्या रंगाची गाई, दोन बैल व कालवड असे पशुधन आहे. दिनांक 5 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता जनावरांना कोठ्यात बांधून ती कोठ्यालगत असलेल्या खोलीत झोपली होती. रात्री 3 वाजता दरम्यान गायीच्या ओरडण्याचा आवाजावरून तिची झोप उघडली. तीनं कोठ्यात डोकावून पाहिला असता आरोपी हा गायीसोबत अनैसर्गिक कृत्य करताना दिसून पडला.
फिर्यादी हिने आरडाओरड केली असता नराधम तिथून पळून गेला. त्यानंतर तीनं आपल्या मुलाला उठवून हकीकत सांगितली. दोघांनी मिळून गायीच्या पायात बांधलेली दोर खोलली. आरोपी हा मारेगाव तालुक्यातील अनंतपुर (सुर्ला) येथील असून मागील दोन वर्षापासून तो रासा येथे आपल्या बहिणीकडे राहतो. महिलेने वणी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राण्यांवर लैंगिक अत्याचार कायदा कलम 377, 511 अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतला आहे.