चोरीच्या घटनांनी हादरले मारेगाव

एकाच रात्री चोरट्यांचा दोन ठिकाणी डल्ला

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील शांतीनगर भागातील एक कार्यालयात व घर चोरट्यांनी फोडले. गुरुवारी रात्रीची ही घटना आहे. यात कार्यालयातील कॅमेरा तर घरातील काही वस्तू व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. एकाच रात्री दोन चोरी झाल्याने शहर हादरून गेले आहे.

शहरातील शांतीनगर या भागात रात्री कार्यललायला कुलूप लावून असल्याच्या फायदा घेत चोरट्यानी घराचे कुलुप तोडून मेलजोल संस्था कार्यालयातील कॅनान कंपनीचा कॅमेरा चोरट्यानी लंपास केला तर त्याच परीसरातील एका घरातील कुलूप तोडून आलमारी, पलंगातील वस्तु अस्ताव्यस्त करीत चार हजार रुपये लंपास केले या संदर्भात मेलजोल येथील एका व्यक्तीने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे

शांतीनगर परिसरात प्रभाग क्रमांक येथे अहमद शेख हे आपल्या कुटूंबासह राहतात. गेल्या 15 दिवसांपासून ते बाहेरगावी गेल्याचे त्यांच्या घराला कुलूप होते. गुरुवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास घराच्या मुख्य दारवाज्याचे कुलुप व कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील अलमारी, बेड मधील सामान अस्तावस्त करीत आलमारीत असलेली चार हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली.

या घरासमोरील मेलजोल या संस्थेचे कार्यालय आहे. या कार्यालयालाही कुलूप होते. चोरट्यांनी घरात चोरी केल्यानंतर या कार्यालयाकडे आपला मोर्चा वळविला. त्यांनी कुलुप तोडून कार्यालयात ठेवलेला कॅनॉन कंपनीचा फोटोग्राफी कॅमेरा लंपास केला. याची किंमत सुमारे 35 हजार रुपये आहे. एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी झाल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे पो. नि जगदिश मंडलवार यांचे मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करित आहे.

Lead StoryMaregaon
Comments (0)
Add Comment