मासे पकडायला गेलेच्या विद्यार्थ्याचा नदीत मृत्यू

नदीजवळ विद्युत खांब आढळला, मृत्यूचं गुढ वाढलं

वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील तरुणाचा मासे पकडताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा तरुण त्याच्या मित्रांसोबत पळसोनी येथील नदीवर मासे पकडायला गेला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करून तपास सुरू केला आहे.

वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या राजूर कॉलरी येथील रजा अजगर अहमद (16) हा विद्यार्थी मित्रांसोबत पळसोनी येथील नदीवर मासे पकडण्यासाठी गेला होता. नदीवर गेल्यानंतर त्यांनी मासे पकडले, पण रजाला झटका आल्यानं तो तिथेच पडला. या प्रकारामुळे त्याचे मित्र घाबरले आणि त्यांनी तिथून घाबरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच त्याला बाहेर काढून ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.

नदीच्या लगतच वीजेचा सिमेंट खांब आहे. या घटनेत त्याचा मृत्यू विद्युत प्रवाहानं झाला की आणखी काही हे अद्याप निष्पन्न झालं नाही. त्यांनी विद्यृत प्रवाह लावून मासोळी पकडली की काय असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. त्यामुळे सध्या तरी रजाचा मृत्यू कसा झाला हे गुलदस्त्यातच आहे.

FishingNirgudaRajurRajur colory
Comments (0)
Add Comment