वणी ते शिंदोला बससेवा सुरु करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी ते शिंदोला ही बससेवा सुरु करण्याची मागणी परिसरातील पालकांनी केली आहे. याबाबत विजय पिदूरकर यांच्या नेतृत्त्वात विद्यार्थी व पालकांनी निवेदन दिले. आधी वणी ते शिंदोला माईन्स अशी बससेवा होती. त्यामुळे बस माईन्स पर्यंतचा प्रवास करीत होती. मात्र शिंदोला ते शेवाळा हा रस्ता अवजड वाहतुकीमुळे खराब झाला आहे. त्यामुळे ही बससेवा केवळ शिंदोला गावापर्यंत सुरु आहे. परिणामी विद्यार्थ्यांना भर पावसाळ्यात ओले होत शिंदोल्या पर्यंत प्रवास करावा लागतो. शिवाय विद्यार्थ्यांना नाहक पायपिट करावी लागत आहे. अनेकदा वेळेत न पोहोचल्यास त्यांची शाळा देखील बुडत आहे. त्यामुळे ही बससेवा पूर्ववत करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. निवेदन देते वेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Lead StoryShindolaShindola Coal MinesVijay Pidurkar