आज 3 रुग्ण, आता तालुक्यात केवळ 34 ऍक्टिव्ह रुग्ण

गर्दी केल्यास संसर्ग वाढण्याची शक्यता

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळलेत. यात वणी शहरातील 2 तर ग्रामीण भागातील 1 रुग्ण आहे. शहरात प्रगती नगर व माळीपुरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर ग्रामीण भागात मार्की येथे 1 रुग्ण आढळला. आज 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या रुग्णसंख्येवरून तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही आता 34 झाली आहे. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या जरी कमी असली तर अनलॉकच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. बाजारपेठ सुरू झाली आहे. जर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास आणि मास्कचा उपयोग न केल्यास संसर्ग वाढण्याची शक्यता वाढू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.  

आज रविवारी दिनांक 6 जून रोजी यवतमाळहून 72 अहवाल प्राप्त झालेत. यात 3 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात. याशिवाय आज 39 संशयीतांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात सर्व संशयीत निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 14 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 14 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 34 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 2 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 23 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 9 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5250 रुग्ण आढळून आलेत. यातील 5123 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

घरभाडे मागितले म्हणून घरमालकाला जबर मारहाण

तेलंगणात रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात

Corona Update WaniLead Story