आय एम ए काटोलचा पदग्रहण समारंभ

अध्यक्षपदी डॉ. एस. पी. टावरी तर सचिव म्हणून डॉ. अमित बंड यांची निवड

सुनील इंदुवामन ठाकरे, काटोल: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदग्रहण समारंभ डॉ. एन. डी. काळवीट स्मृती सभागृहात झाला. काटोल शाखेची 2018 ते 2020 काळासाठी ही कार्यकारिणी निवडण्यात आली. नव्या कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून डॉ. एस. पी. टावरी, उपाध्यक्ष म्हणून डॉ. सुनीता सावरकर व डॉ. निखील नागपूरकर, सचिव म्हणून डॉ. अमित बंड य सहसचिव डॉ. सचिन घाटे, कोषाध्यक्ष डॉ. सचिन चिंचे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीतील सदस्यांमध्ये डॉ. पंकज करांडे, डॉ. नरेश राठी, डॉ. अमोल करांगळे, डॉ. अमोल अंबाडकर, डॉ. चेतन रेवतकर यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे यांच्या अध्यक्षतेत हा सोहळा झाला. आयएमए प्राथनेने कार्यक्रमाचा आरंभ झाला. महाराष्ट्र मेडिकल काँसीलचे सदस्य डॉ. अनिल लद्धड आणि महाराष्ट्र आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांची या सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी डॉ. प्रेरणा बारोकर, डॉ. संजय टावरी व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन डॉ. निखील नागपूरकर यांनी केले. आभार डॉ. अमित बंड यांनी मानले.

DoctorsIMAIndian Medical AssociationInstalationkatolLead StoryNagpuar
Comments (0)
Add Comment