पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथे अधीक्षक विजय बहादुरे यांची पुसद येथे बदली झाल्यानिमित्त त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी वर्ग 10 वी, 12 वी तसेच पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील निरोप देण्यात आला. या समारंभाचे मंगल तेलंग हे अध्यक्ष होते तसेच डॉ. रोहित वनकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती
अधिक्षक विजय बहादुरे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुस्तकं देऊन सत्कार करण्यात आला. विजय बहादुरे यांनी विध्यार्थ्यांना पुस्तके भेट दिलेत. यावेळी वसतिगृह परिसरातील नागरिकांनी विजय बहादुरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकंरांची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मनोगत व्यक्त करताना बहादुरे यांनी वसतिगृहातील विद्यार्थांसोबत घालविलेल्या आठवणींना उजाळा दिला व वसतीगृहातील विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगल तेलंग व प्रमुख पाहुणे डॉ. रोहित वनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विध्यार्थांनी विजय बहादुरे यांनी केलेल्या कार्याची माहिती देऊन त्यांचे कार्य प्रत्येक विध्यार्थ्याकरिता बहुमोल असल्याचे विशद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल भरणे यांनी केले तर स्वागतगीत संकेत उमरे यांनी म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सूरज शेंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयेश दारुंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नयन तोडासे, निखिल गाणफाडे, रोहित भरणे, हर्षद चाफडे, सुमेध तेलंग, निकेश पुनवटकर, आकाश पळवेकर, आकाश नवले व वसतिगृहाचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा: