अपूर्ण काम करण्यासाठी व विकासासाठी एक संधी द्या

रासा येथील सभेत सपना मुनगंटीवार यांचे मतदारांना आवाहन
बहुगुणी डेस्क, वणी: भाजप सरकारने या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केलीत. मात्र अद्यापही काही कामे करणे बाकी आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आपण सुधीरभाऊंना संधी द्यावी, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांनी केली. त्या रासा येथील जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रासाचे सरपंच तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुधीरभाऊंचं कार्य आणि क्षमता पाहिली. नागरिकांनीदेखील त्यांच्या कामाचा अनुभव घेतलेला आहे. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रांत सुधीरभाऊंनी भरीव कामगिरी केली. त्यांच्यासाठी लोकसेवा हीच ईश्वरसेवा आहे. ते सदैव सगळ्यांच्या मदतीसाठी धावतात. त्यांचं काम प्रत्यक्ष बोलतं. निराधारांसाठी ते एक मोठे आधार आहेत. ते एक सहृदय आणि संवेदनशील माणूस आहेत. प्राणीमात्र आणि पर्यावरणावर त्यांचं विशेष प्रेम आहे. ते दिलेला शब्द प्रामाणिकपणे पाळतात. भाऊबीज आणि राखीची ओवाळणी म्हणून सर्वांनी त्यांना मत द्यावं असं आवाहन स्वप्ना मुनगंटीवार यांनी केलं.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले की सुधीरभाऊ हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहे. त्यांच्या विकासकामाचे नागरिक प्रत्यक्ष साक्षीदार आहे. सुधीरभाऊ यांचं नेतृत्व असामान्य आहे. जनसामान्याचा आवाज ते संसदेत नक्कीच उचलतील. सुधीरभाऊ जाती-धर्मांच्या पलीकडचे आहेत. सुधीरभाऊ लोकसभेत गेल्यानंतर अनेक समस्या दूर होतील, असा विश्वास आमदार बोदकुरवार यांनी व्यक्त केला. त्यांना मतदान करण्याची विनंती यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून केली.

यावेळी अलका आत्राम आणि अन्य मान्यवरांची भाषणे झालीत. या प्रचार सभेला भाजपचे वणी विधानसभा क्षेत्रातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह रासा व परिसरातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Lead Storyloksabha 2024sapna mungantiwar